रचना क्र. 261
धन्य या नरदेहा आलो
श्री निरंजन रघुनाथ
धन्य या नरदेहा आलो, कृपा केली देवा रे ।
सद्गुरुच्या योगे ठाई पडला निजठेवा रे ॥धृ॥
गजतुरंगादि देहि बरडा-वरति पेरुनि ओऽवा रे ।
ज्ञानजळाविण सुकोनी गेला, पडोनि वरता मोवा रे ॥१॥
बहुजन्माचे सुकृत फळले, सापडला देह केव्हा रे ।
श्रवणे मनने भगवद्भजने, घडलि साधूसेवा रे ॥२॥
धनदारासुत संपत्तिचा बहु, पडला होता गोवा रे ।
देहयंत्रावरि फिरोनि उलटा, उडोनि गेला रावा रे ॥३॥
नामरूपात्मक मिथ्या अवघ्या, समजुनि हरिच्या मावा रे |
निरंजनी रघुनाथप्रसादे, जाला पूर्ण विसावा रे ||४||
