रचना क्र. 250
तारिन दुस्तर हा संसार
श्री निरंजन रघुनाथ · null
null
तारिन दुस्तर हा संसार ॥धृ॥
भक्तांसि तरि तारितसे परि,
दुष्टां करुनि मार ॥१॥
पहा पहा माझ्या नामे एक्या,
केला बहु उद्धार ॥२॥
दीन मी बंधु ऐसा लौकिक,
झाला माझा फार ॥३॥
भक्त-अभक्तासाठि युगायुगी,
धरितो मी अवतार ॥४॥
सत्यप्रतिज्ञा माझी ऐका,
मजसि करा अपकार ॥५॥
पूतना मजसी स्तन पाजू आली,
काय तिचा उपकार ॥६॥
भक्ताच्या तरि अंकित घरचा,
जालो पाडीवार ॥७॥
नीरंजन मी असता या जगि,
जालो की साकार ॥८॥
