रचना क्र. 236
जाले रे, वय जाले रे
श्री रामदास स्वामी · null
null
जाले रे, जाले रे, वय जाले रे ॥धृ॥
अपुले आपण देखिले रे, देखिले ॥१॥ जाले रे..
सद्यप्रचीतीसी आले, आले रे, रे आले रे ॥२॥ जाले रे..
पाहो जाता शरीऽर, खंगले रे, खंगले ॥३॥ जाले रे..
वैभव हे सकळ, भंगले रे, भंगले ॥४॥ जाले रे..
दास म्हणे ऐसे, काय जाले रे, जाले रे ॥५॥ जाले रे..
अकस्मात मरण, आले रे, रे आले रे ॥६॥ जाले रे..
