रचना क्र. 230
हो प्रसन्न सद्गुरुराया
श्री सीताराम महाराज · null
null
हो प्रसन्न सद्गुरुराया । आवरी हे ईश्वरी माया ॥धृ॥
नानाविध योनी फिरता । चुकलो मी या भगवंता ॥१॥
अविवेके विषयी रमता । नाठवे श्री गुरुदत्ता ॥२॥
तव कृपालेशही मिळता । तरी शांती ये मच्चित्ता ॥३॥
गुरुवीणे शरणचि नाही । श्रुतिशास्त्रे केली ग्वाही ॥४॥
धावत ये तू लवलाही । करुणामृत देई सखया ॥५॥
(संक्षिप्त स्वरूपातील पद)
