रचना क्र. 225
सदा संतछाया देई देवराया
श्री पेठेकाका · null
null
सदा संतछाया देई देवराया ।
तेणे याचि काया उद्धरेन ॥धृ॥
उद्धरेन त्यांनी केल्यावरी कृपा ।
हाचि मार्ग सोपा दिसतसे ॥१॥
दिसतसे साधन कर्म योग ज्ञान ।
अवघे हे कठीण वाटतसे ॥२॥
वाटतसे शरण जाणेही कठीण ।
माझे मज मीपण आड येते ॥३॥
आड येते त्याला सगुण उपाय ।
सावलीसी जाय संतांचिया ॥४॥
संतांचिया ठायी अपार ही दया ।
दीना उद्धराया राखतील ॥५॥
