रचना क्र. 195
देव हाचि धर्म
श्री पेठेकाका · null
null
देव हाचि धर्म, स्वधर्म ते कर्म ॥धृ॥
कृतज्ञता नेम, अविश्रांत काम ।
अर्पण ते मर्म, आम्हा कळो ॥१॥
बंधनांचे काम, मुक्ती देणे परम ।
आचरण मर्म, आम्हा कळो ॥२॥
राम हा विश्राम, नाम हेचि धाम ।
वृत्त्यंतर मर्म, आम्हा कळो ॥३॥
संतमार्ग सुगम, सर्वांभूती प्रेम ।
श्रद्धाकृती मर्म, दीन म्हणे ॥४॥
