रचना क्र. 194
देतसे श्रांतांना सावली
श्री पेठेकाका · null
null
देतसे श्रांतांना सावली ।
आमुची प्रेमळ गुरुमाउली ॥धृ॥
देवध्यास अन् प्रखर विरक्ती ।
तीव्र तपाने सद्गुरुप्राप्ती ।
रामकृपा जाहली ॥१॥
स्वरूपात ते नित्य राहती ।
बाह्यात्कारी प्रपंच करिती ।
राहुन गोंदावली॥२॥
योग, ज्ञान ती कठिण साधने ।
सामान्यांनी नामच घेणे ।
देती गुरुकिल्ली ॥३॥
अन्न गरजुला,वळण वृत्तिला ।
मार्ग जो कुणी दीन चालला ।
छत्र तया जाहली ॥४॥
