रचना क्र. 185
जागे होता दु:ख न उरते
श्री पेठेकाका · null
null
जागे होता दु:ख न उरते, सुखही ठरते फोल,
गड्यांनो स्वप्नामधले ढोल, सारे स्वप्नामधले ढोल ! ॥धृ॥
सनई मंजुळ मूल जन्मता ।
विव्हळते कुणि दु:ख सोसता ।
ऊर पिटी कुणि जिवलग जाता ।
जागृति येता फोल, सारे स्वप्नामधले ढोल !॥१॥
कुणि मारितो पहा बढाया ।
कुणि कुणाच्या पडतो पाया ।
साठवितो, कुणि दवडी वाया ।
भेदच सारा फोल, सारे स्वप्नामधले ढोल ! ॥२॥
देह नव्हे मी हे जाणवता ।
देवत्वाचे भान जागता ।
प्रपंच हेही स्वप्नच कळता ।
दीना करि रे मोल, सारे स्वप्नामधले ढोल ! ॥३॥
