रचना क्र. 169
कधि न उपाशी, कधि न तुपाशी
श्री पेठेकाका · null
null
कधि न उपाशी, कधि न तुपाशी, सदा गोड भाकरी
देई तुझीच रे चाकरी, देवा तुझीच रे चाकरी ॥धृ॥
शेतामध्ये, उद्योगी वा
पोटार्थी जरि देह झिजावा
धना जोडिते, परि न राघवा
उद्धारास्तव पुरी न पडते, जगातली नोकरी ॥१॥
कितीक आले, कितीक गेले
जगी कुणाचे नाव न उरले
फेऱ्यामध्ये फिरत राहिले
दास तुझे परि मुक्त जाहले, धरुनि तुझी नोकरी ॥२॥
पोटासाठी देह झिजू द्या,
अनुसंधानी परी राहु द्या
आनंदाचा मोबदला घ्या
दीन म्हणे रे जागृत वांछिति, सदा तुझी नोकरी ॥३॥
