रचना क्र. 168
ऐसी संतांची ही ग्वाही
श्री गणोरे बाबा · null
null
ऐसी संतांची ही ग्वाही ।
देव भेटे याचि देही ॥धृ॥
देह याचसाठी जाण ।
होई नर नारायण ।
तुझे तूच शोधुनि पाही ।
देव भेटे याचि देही ॥१॥
नित्य वदता सत्य वाणी ।
दया, क्षमा, शांती मनी ।
ऐसी स्थिती ज्याचे ठायी ।
देव भेटे याचि देही ॥२॥
जिव शिव जाणे मना ।
तोचि अद्वैत जाणा ।
श्रीरामाचा भाव राही ।
देव भेटे याचि देही ॥३॥
