रचना क्र. 165
तुमचा परोचा दिला तुम्हापाशी
श्री जयरामनाना महाराज · null
null
तुमचा परोचा दिला तुम्हापाशी ।
चुकल्या कर्माची करा क्षमा ॥१॥
तुमच्या पायांची मज जोड व्हावी ।
आणीक ते जीवी नाही आशा ॥२॥
तुम्ही संतजन कृपेचे सागर ।
दास मी पतित हीन दीन ॥३॥
जयराम विठ्ठल तुमचा सेवक ।
चरणी मस्तक असो माझे ॥४॥
