रचना क्र. 161
काय ‘माझे’ आहे शोधुनिया पाहे
श्री पेठेकाका · null
null
काय ‘माझे’ आहे शोधुनिया पाहे
बेसावध साहे दु:ख जगी ! ॥धृ॥
उभा भूमीवरी सोय जन्मभरी
एक कण तरी निर्मिली का ? ॥१॥
सांभाळितो प्राणा सृष्टीतील वारा
काय प्राण खरा माझा होय ? ॥२॥
जरी वाटे माझ्या देह मालकीचा
येई तोच त्याचा राही जाई ! ॥३॥
जग-जीव सारे मावळे उजाडे
कुठेही न अडे माझ्याविना ! ॥४॥
‘नाही माझे काही’ हा शब्द , उच्चार
तो पाही उधार ठरेचि ना ? ॥५॥
‘माझे माझे’ सारे देई दु:ख , चिंता
‘तुझे’म्हणता त्यांची वार्ता कोठे ? ॥६॥
सावध जीवन, कर्तव्य, आचार
शांतीचे माहेर चित्त करी ! ॥७॥
सोनियाचे दिन देव किती देई
कृतज्ञ तू राही दीन म्हणे ! ॥८॥
