रचना क्र. 160
हरि नाम मुखी, हरि नाम मुखी
श्री विश्वनाथ महाराज · null
null
हरि नाम मुखी, हरि नाम मुखी ।
हरि करी सुखी, नाम घेता ॥१॥
हरिच्या नामाने , तरले साक्षात ।
भक्तीने समर्थ , झाले जगी ॥२॥
सत्य कर्मासाठी, हाचि मूळ पाया ।
नाम घेता वाया, कोण गेला ॥३॥
म्हणे विश्वनाथ, हरि हरि बोला ।
हरिकृपे चाला, कळे भक्ती ॥४॥
