रचना क्र. 156
तुम्ही माझे राम
श्री पेठेकाका · null
null
तुम्ही माझे राम ।
चित्तासी आराम ॥धृ॥
तुम्ही मनासी विश्रांती ।
तुम्ही स्थिती तुम्ही गती ॥१॥
तुम्ही हृदयीचा स्पंद ।
तुम्ही ठेका तुम्ही छंद ॥२॥
तुम्ही योग तुम्ही क्षेम ।
तुम्ही देव तुम्ही नाम ॥३॥
तुम्ही जड तुम्ही जीव ।
तुम्ही चेतनेचे नाव ॥४॥
दीना वाटे शब्द सूर ।
तुम्ही व्यापिला ईश्वर ॥५॥
