रचना क्र. 155
देव शोधिता शोधिता
श्री पेठेकाका · null
null
देव शोधिता शोधिता ।
प्राण सापडले हाता ॥धृ॥
वाया गेला अवघा वेळ ।
घालिता तत्त्वांचा मेळ ॥१॥
मन पिंजता पिंजता ।
व्यर्थ गोळा झाला गुंता ॥२॥
किती भाषा किती मते ।
सारे कल्पनेचे गोते ॥३॥
जनी वनी धांडोळिता ।
भ्रमे भुलविले चित्ता ॥४॥
दीन म्हणे कृपा होता ।
‘नाम’‘प्राण’ आले हाता ॥५॥
