रचना क्र. 148
संतसंगतीचा लाभ घेई मना
श्री विश्वनाथ महाराज · null
null
संतसंगतीचा लाभ घेई मना ।
नको आडराना जाऊ कोठे ॥१॥
आडमार्गी जाता दु:ख होई जीवा ।
आठविशी देवा काय गोडी ॥२॥
म्हणोनी धरावा संग सज्जनाचा ।
केलेल्या कर्माचा मिटे भोग ॥३॥
म्हणे विश्वनाथ वासना ओढाळ ।
होई ती निर्मळ संतसंगे ॥४॥
