रचना क्र. 133
काम विषय त्याग करी
श्री गोंदवलेकर महाराज
काम विषय त्याग करी ।
गर्व दंभ जीवे मारी ॥१॥
नसे तृष्णा आणि वासना ।
द्रव्यलोभ नाणी मना ॥२॥
विवेकाचे निघे घर ।
प्रेमभक्तीचे पाझर ॥३॥
तीर्था गेलियाची खूण ।
काही पालटावे अवगुण ॥४॥
दास म्हणे ऐसे दृढ धरा ।
मग सुखे यात्रा करा ॥५॥
