रचना क्र. 117
पडता जड भारी
श्री तुकोबा
पडता जड भारी ।
दासी आठवावा हरी ॥१॥
मग तो होउ नेदी सीण ।
आड घाली सुदर्शन ॥२॥
नामाच्या चिंतने ।
बारा वाटा पळती विघ्ने ॥३॥
तुका म्हणे (रे) प्राण ।
करा देवासी अर्पण ॥४॥
रचना क्र. 117
श्री तुकोबा
पडता जड भारी ।
दासी आठवावा हरी ॥१॥
मग तो होउ नेदी सीण ।
आड घाली सुदर्शन ॥२॥
नामाच्या चिंतने ।
बारा वाटा पळती विघ्ने ॥३॥
तुका म्हणे (रे) प्राण ।
करा देवासी अर्पण ॥४॥