रचना क्र. 93
अज्ञानाचा नाश केला तू दुरिताचा
श्री कृष्णदास महाराज · null
null
अज्ञानाचा । नाश केला तू दुरिताचा ॥धृ॥
मी कोण मज हे कळले ।
गुरुकृपाघन मजवरि वळले ।
शान्तिसुखाते मजला दिधले ।
मज नकळत साचा ॥१॥
नाम ऐकूनी रूप पाहिले ।
ध्यान पाहुनी ज्ञान लाभले ।
कृपाप्रसादे एकरूप केले ।
लाभ निजरूपाचा ॥२॥
अनन्य होता चिंता पळाली ।
सर्वाठायी गुरुराज माऊली ।
भक्तावरि करी कृपा साउली ।
ध्यास पदरजाचा ॥३॥
वरिले मी गुरुचरणाला ।
जयाने माझा भवताप राहिला ।
रघुनाथहि ज्या वंदि पदाला ।
धन्य प्रताप गुरुचा ॥४॥
