रचना क्र. 87
गुरुचे झालो दास
श्री पेठेकाका · null
null
आम्ही गुरुचे झालो दास, आनंदे रे ॥धृ॥
विकारांचे दास्य केले
सुखाशेने कष्ट केले
मृगजळी तृषा शमणार, कशी रे ? ॥१॥
माणसांचे दास्य केले
गणगोत वाढविले
अपूर्णाचे पूर्ण होणार, कसे रे ? ॥२॥
जगालाही दास केले
वित्त विद्या सत्ता झाले
क्षणिकांचे सुख टिकणार, कसे रे ? ॥३॥
देव गुरू जोडियेला
दीन म्हणे बोध झाला
आनंदी आनंद टिकणार, आता रे ! ॥४॥
