रचना क्र. 86
बंध विमोचन राम माझा
श्री वेण्णा स्वामी · null
null
बंध विमोचन राम ।
माझा बंध विमोचन राम ॥धृ॥
सकलहि ऋषिमुनि भजति तयासी ।
तेचि एक सुखधाम ॥१॥
सद्गुरुकृपया ओळखिला जो ।
कौसल्येचा राम ॥२॥
भावभक्तिच्या सुलभसाधनी ।
पुरवी सकळहि काम ॥३॥
शरण ही वेणा आत्मारामा ।
पावली पूर्णविराम ॥४॥
