रचना क्र. 83
माझे प्रपंची या गुरुराया
श्री पेठेकाका · null
null
माझे प्रपंची या गुरुराया ।
तुम्हा विनवितो पाया ॥धृ॥
देही घर मांडियेले ।
द्वार इंद्रिये लाविले ॥१॥
विकारांचे गणगोत ।
भ्रम पसारा मांडीत ॥२॥
सुख आभास कारंजी ।
आशापाश घाली रुंजी ॥३॥
असा माझा हा प्रपंच ।
परी तोडवेना पाश ॥४॥
तुमची ओढ अंतरात ।
मज येणे ना जमत ॥५॥
दीन म्हणे पाय अडे ।
म्हणुनि घालितो साकडे ॥६॥
