रचना क्र. 81
देहालागी कष्ट केले
श्री रामदास स्वामी · null
null
देहालागी कष्ट केले ।
परि ते अवघे व्यर्थ गेले ॥१॥
देह देवाचे कारणी ।
होता देव होतो ऋणी ॥२॥
प्राणी लोभे गुंडाळला ।
पुढे अंतकाळ आला ॥३॥
जे जे काही कष्ट केले ।
ते ते अवघे व्यर्थ गेले ॥४॥
नाना परी सांभाळिली ।
पुढे काया हे जाळिली ॥५॥
दास म्हणे मूर्खपण ।
पुढे जन्मासी कारण ॥६॥
