रचना क्र. 79
तुझी मज लागलीसे आस
श्री पेठेकाका · null
null
तुझी मज लागलीसे आस ।
भेटीलागी जीव कासावीस, आता रे ॥धृ॥
ध्यानी मनी स्वप्नी होता देह, माझ्या रे ।
प्रपंचाचे काम सर्वस्व रे, होते झाले ।
विकारांचे मन होते दास रे, तेव्हा ॥१॥
गोळा केले सारे सारे फोल, ठरले रे ।
मना सांभाळीता झालो दीन, हीन रे ।
कळो आले तव वचनी रे, सारे ॥२॥
बोध कृपा शब्दे सावधान, केले रे ।
प्रपंचाचे रूप दावियेले, सत्य रे ।
बोध मनी जागविता चुकतो रे, रोज ॥३॥
अपराध माझे पोटी घाली, दयाळा रे ।
जीव शांत करी ठेवी पायी, तुझिया रे ।
दीन म्हणे भक्तीसाठी दीन रे, तुझिया ॥४॥
