रचना क्र. 4
नित्य उठोनिया खायाचीच चिंता
श्री तुकोबा · null
null
नित्य उठोनिया खायाचीच चिंता ।
आपुल्या तू हिता नाठवीसी ॥१॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा ।
चिंता तुझी तेव्हा केली तेणे ॥२॥
चातका लागुनि मेघ नित्य वर्षे ।
तो तुज उदास करील केवी ॥३॥
पक्षी वनचरे आहेत भूमीवरि ।
तयालागी हरी उपेक्षीना ॥४॥
तुका म्हणे भाव धरुन राहे चित्ती ।
तरि तो श्रीपती उपेक्षीना ॥५॥
