रचना क्र. 70
चौऱ्यांशी आसने केली
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
चौऱ्यांशी आसने केली ।
काय तुला प्राप्ती झाली ॥धृ॥
अष्टांग योग केला ।
परी काळ घेउनि गेला ॥१॥
कुंडलिनी उत्थापियली ।
सहज प्राप्ती दुरावली ॥२॥
नित्य वेद पाठ केले ।
अर्थ वेगळे राहिले ॥३॥
शब्द ज्ञान पैसावला ।
भक्तिज्ञानासी मुकला ॥४॥
सिद्धिमागे लागला ।
त्यासी दिवसा घाला आला ॥५॥
चक्रमुद्रा केली भेदी ।
त्यासी भ्रांति लागली आधी ॥६॥
दास म्हणे राम गाता ।
सर्व सहज आले हाता ॥७॥
