रचना क्र. 46
माझे चित्त सदा करा पायी स्थिर
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
माझे चित्त सदा करा पायी स्थिर ।
अखंड रघुवीरस्मरण राहो ॥१॥
नामस्मरण हेचि चित्ताचे जीवन ।
एवढी मज खूण सांगा स्वामी ॥२॥
तुम्हावीण कोणा शरण आता जाऊ ।
माझे मायबापा दीनानाथा ॥३॥
दीनदास म्हणे आता प्राण माझा जाय ।
करी माझी सोय रामनामी ॥४॥
