रचना क्र. 45
केव्हा कृपा करिल गुरुमाय
श्री हंसराज स्वामी · null
null
केव्हा कृपा करिल गुरुमाय ।
कोणी तरी सांगा हो ॥धृ॥
मजला नलगे हा संसार ।
मी मी माझे हा जोजार ।
व्यर्थचि होणे धराभार ।
ऐसे वाटुन काय ॥१॥
अगा विष्णु सदाशिवा ।
अगा गजानना ब्रह्मदेवा ।
रामकृष्ण देवदेवा ।
दावा कोणी सद्गुरुपाय ॥२॥
वेद गातसे जयास ।
तयाविण अवघे फोल ।
कधि तुटेल हा भवपाश ।
मोक्ष मज होइल काय ॥३॥
