रचना क्र. 35
फुटके माझे तारू
श्री पेठेकाका · null
null
फुटके माझे तारू, नेतिल, पैलपार सद्गुरु ॥धृ॥
घट पुण्याचा भरला, दुर्लभ देह जिवा लाभला
शक्तिबुद्धिने भरला, हाती चिंतामणि आला
दुर्भाग्ये परि मजला नकळे देहे काय करू ?॥१॥
लोभ किती मी करितो, हेवा सतत कुणाचा करितो
अखंड चंचल बनतो, क्षोभे दु:ख जगाला देतो
टिकण्यासाठी धडपड माझी, विनाश करिते सुरू ! ॥२॥
नवद्वारांनी शिरते पाणी, नच आवरिता येेते
किती जरी कष्टलो, मनाला आवरणे ना जमते
दया येउनी गुरू कृपाघन येइ मला सावरू !॥३॥
संसारी हे व्यर्थ कष्टणे बोध मना झाला
ध्येय कळे, परि पैल गाठणे कठीण हे मजला
दीन म्हणे परि कुशल सद्गुरु, तोच भरवसा धरू ! ॥४॥
