रचना क्र. 39
श्री शंकर महाराज
श्री पेठेकाका
नमन श्री शंकर महाराजांस ।
श्री दत्त, स्वामीसमर्थ, शिवास ।
अष्टावक्र मुनी अवतारास ।
वंदू शाश्वत अस्तित्वास ।।१।।
विषयी अहंकारी ठेवण्या दूर ।
अपेय अभक्ष्य मांडिता समोर ।
भक्तांसाठी शुद्ध आचार ।
खरे स्वरूप दाविता ।।२।।
निरपेक्ष प्रेम साधन थोर ।
सगुणनिर्गुणा देता समादर ।
शरण, आर्तांस अपूर्व आधार ।
आपण आजही ।।३।।
