रचना क्र. 36
श्री गुरुपद
श्री पेठेकाका · null
null
जगजनाच्या उद्धाराची चिंता ।
जगदीशासि सदैव असता ।
निर्मिली असे गुरुपदव्यवस्था ।
विश्वामध्ये अवघ्या ॥११३॥
ती न जाणे धर्मपंथ ।
भेदभाव मानवनिर्मित ।
उद्धारप्रयत्नांत मदत ।
कोणासही करीतसे ॥११४॥
साह्य मागता आर्त होऊन ।
आकारा आणिते संत सज्जन ।
यास्तव कृतज्ञतेने करू नमन ।
गुरुपदप्रतीकास ॥११५॥
