रचना क्र. 24
पूज्य अंबिकाबाई पेठे, नारिंग्रे
श्री पेठेकाका
नमन साध्वी अंबिकाबाईंस ।
केला नारिंग्रे ग्रामी वास ।
राणेस्थापित श्रीरामसेवेस ।
जीवन अखंड वाहिले ॥७७॥
अकाली पतिछत्र हरपले ।
पंढरिरायाने रामछत्र दिले ।
उपवासी शरीर कष्टविले ।
कर्तव्य तसे देवकार्यी ॥७८॥
आपुली गोसेवा धन्य धन्य ।
व्रतस्थता, रामनिष्ठा अनन्य ।
आशीर्वादे होवो राम प्रसन्न ।
आपुल्यापरी आम्हा ॥७९॥
