रचना क्र. 22
श्री तात्यासाहेब केतकर महाराज
श्री पेठेकाका · null
null
पूर्ण प्रेमादरे साष्टांग नमन ।
श्री केतकर महाराज धन्य ।
तात्या, आपुल्या इतुके अनन्य ।
क्वचित कुणी जाहले ॥७१॥
निष्ठेचा अपूर्व वारसा ।
स्वतःस विसरण्याचा आपुला वसा ।
मीचा पुसुनी गेला ठसा ।
अशक्य शक्य झाले श्रीकृपे ॥७२॥
मग आत्मज्ञान प्रगटले ।
ब्रह्मासी तादात्म्य झाले ।
कोणा कळे, कोणा न कळे ।
कारण तदाकार श्रीराम ॥७३॥
