रचना क्र. 14
श्री साईबाबा, शिर्डी
श्री पेठेकाका
नमन श्री साईबाबांस ।
धर्मपंथातीत महापुरुषास ।
भूवैकुंठ केले शिर्डीस ।
अतर्क्यपणे प्रकटुनी ॥४७॥
माणुसकीचा धर्म वाढविला ।
रामरहीम एक केला ।
श्रद्धा, सबुरी, परोपकार शिकविला ।
हितासाठी सर्वांना ॥४८॥
अतर्क्य लीला, ईशसत्ता ।
आपुल्यारूपे अनुभविता ।
दुजेप्रमाण नको आता ।
पावन आम्हांसी करावे ॥४९॥
