रचना क्र. 8
विसर्जनाचे मंत्र
श्री पेठेकाका · null
null
* विसर्जनाच्या वेळी म्हणावयाचे मंत्र *
येथून पुढले मंत्र, म्हणणे नच आज ते ।
श्रींच्या विसर्जनावेळी , उपयोगा दिले इथे ॥
नेहमीची करणे पूजा उत्तरपूजा म्हणूनिया ।
अक्षता हाति घेऊनी ,देवांना अंति प्रार्थना ॥
देवांनी घेउनी जाणे पूजा पार्थिवमूर्तिची ।
स्वस्थानी परत आनंदे, पुन्हा आगमना इथे ॥
वाहणे अक्षता देवा मूर्ती किंचित हलविणे ।
मग ती तळेनदी येथे ,विधिपूर्वक विसर्जिणे ॥
॥ मंगलमूर्ती मोरया ॥
॥ श्रीराम ॥
