रचना क्र. 8
श्री अन्नपूर्णाष्टक
श्री पेठेकाका · null
null
।।श्री अन्नपूर्णामाता की जय।।
।।श्री गणेशाय नमः।।
।।श्री अन्नपूर्णे नमः।।
मला मातृउदरी सांभाळिले तू ।
तसे जन्मता क्षीर झालीस ती तू।
जशा पोषणा फळपानतुळशी।
तशी रक्षणा औषधी तूचि होशी।।१।।
जमिनीवरी मी जव बाल्यकाळी।
कळेना वळेना कायाहि दुबळी।
बोटा धरूनी उभे तूच केले।
तुझ्या शक्तिने चालणे शक्य झाले।।२।।
तसा जन्मता जीव प्राणीच असतो।
तुझिया कृपेने माणूस घडतो।
देवत्व येण्यास पुढे जिवाला।
कृपा साह्यकारी मनमाउलीला।।३।।
कितीएक कर्मे आजन्म केली।
कितीएक वर्षे जगण्या मिळाली।
किती धर्म झाला किती योग घडला।
तुझिया कृपेनेच तो शक्य झाला।।४।।
प्रारब्ध संपे क्रियमाण नाही।
नुरे जीवनी संचिता ठाव काही।
तशी भक्तिसेवेस संधी मिळाली।
तू रक्षिल्याने ती शक्य झाली।।५।।
जसा जीव म्हणुनी जगतात आलो।
तुझिया कृपेनेच आयुष्य जगलो।
जाणीव याची मजला न झाली।
कित्येक वर्षे विस्मृती जहाली।।६।।
क्षमा प्रार्थुनी अन्नपूर्णे तुझी मी।
विनवीत ठेवी सेवेत धामी।
हेतू तुझा वा तुझे कार्य होत।
माझ्याकडूनी ते होऊदेत।।७।।
प्रत्येक दिवशी सेवा घडावी।
ती शुध्दभावे कृपेनेच व्हावी।
हे अन्नपूर्णे ! जय मातृदेवी।
करी प्रार्थना नित्य पायीच ठेवी।।८।।
।।श्री अन्नपूर्णामाता की जय।।
।।श्री सद्गुरूनाथ महाराज की जय।।
