रचना क्र. 11
भोजनसमयी म्हणावयाचे श्लोक
श्री पेठे काका
भोजनापूर्वी म्हणावयाचा श्लोक
माझ्या सन्मुख अन्नरूप बनुनी,
प्रभुप्रेम जे प्रकटले।
बीजे-शेतकरी-मजूर अवघे,
सृष्टीतले राबले।
जगवाया मजला स्मरू किति कुणी,
अज्ञात जे कष्टले।
सेवू अन्नप्रसाद नाम स्मरुनी,
जगुया कराया भले।।
।। श्रीराम ।।
भोजनानंतर म्हणावयाचा श्लोक
झाले भोजन आणि चिंतन तसे,
घडले कृपासेवन।
प्राणापान उदान व्यान सम हे,
अन्नास स्वीकारुन।
अन्नब्रह्म ठरोत पोषण जिवा,
मुक्तीसही साधन।
आता घेउ विराम, नाम स्मरुनी,
वाहू जगा जीवन।।
।। श्रीराम ।।
