रचना क्र. 9
जिज्ञासा प्रार्थना
श्री पेठे काका
जागृत जीवन जगुनी,
जिज्ञासा जागती ठेवुया जगती ।
विषय असो स्थूलाचा,
सूक्ष्माचा देव वा खरी प्रगती ॥
पृच्छा करूनी साधू,
जिज्ञासेची तशीच परिपूर्ती ।
देवकृपे सर्वांना,
लाभो इहपर दोहोंत श्रेष्ठ गती ॥
-- श्रीराम --
