रचना क्र. 6
आता विश्वात्मके देवे ।
श्री ज्ञानेश्वर माउली · null
null
आतां विश्वात्मकें देवें ।
येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें ।
पसायदान हें ॥
जे खळाची व्यंकटी सांडो ।
तया सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो ।
मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो ।
विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो ।
प्राणिजात ॥
वर्षत सकळमंगळीं ।
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी ।
भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव ।
चेतनाचिंतामणीचे गांव ।
बोलते जे अर्णव ।
पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न ।
मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन ।
सोयरे होतु ॥
किंबहुना सर्वसुखीं ।
पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं ।
अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये ।
विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्टविजयें ।
होआवें जी ॥
येथ म्हणे विश्वेशरावो ।
हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो ।
सुखिया झाला ॥
