रचना क्र. 56
श्री कलावती आईंची आरती
श्री पेठेकाका · null
null
ओवाळू कलावती माता ।
जय जय कलावती माता ॥धृ॥
संसाराचे रूप जाणिले ।
मायेसंगे दुःख ठेविले ।
नातीगोती, मुलां त्यागिले ।
हरि धरुनी चित्ता ॥१॥ ओवाळू...
विशीत अवघ्या येत विरक्ती ।
निंदेने कधि ढळे न शांती ।
तीव्र ओढिने सद्गुरुप्राप्ती ।
नामी एकाग्रता ॥२॥ ओवाळू...
प्रयाण केले गुरुआज्ञेने ।
भक्तिमान जन होत कीर्तने ।
नास्तिक अगणित आस्तिक भजने ।
जपली निरपेक्षता ॥३॥ओवाळू...
बालांमध्ये भक्ति रुजविली ।
थोरांचीही वृत्ति बदलली ।
दीनजिवांना माय लाभली ।
शाश्वत ही सत्ता ॥४॥ ओवाळू...
