रचना क्र. 41
श्री पंतांची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय श्रीपंतपदी या प्रेमळ, ओवाळू आरती ॥
हे अवधूता नाही उपमा, श्रुती नेति वदती ॥धृ॥
ज्ञानमार्ग हा हाती दिधला, राहुनि संसारी ॥
बाळप्पांची ध्वजा उभविली, भजनभक्तमंदिरी ॥१॥
देवमार्ग निरपेक्ष बोधिला, भेद दूर करुनी ॥
दीनजिवांना निर्भय केले, शुद्ध देव दावुनी ॥२॥
