रचना क्र. 38
श्री मामासाहेबांची आरती
श्री पेठेकाका · null
null
दांडेकर कुलभूषण मामा, घ्यावे दंडवता ।
विठ्ठलपायी मन राहू दे, इतुके द्या भक्ता ॥धृ॥
जोगबुवांच्या निःस्पृहतेची प्रतिमूर्ती तुम्ही ।
व्यासंगाचा पाया दिधला भक्तीला तुम्ही ॥
ब्रह्मचर्य, वैराग्यामध्ये सूर्यासम होता ।
अज्ञ, शरण जीवांना शीतल चंद्रासम होता ॥१॥
पाश्चिमात्य ज्ञानाचा संगम पूर्वेशी केला ।
ढोंगिजनांना जरब बसवुनी, सात्त्विक मार्ग दिला ॥
विद्यार्थी अन् वारकर्यांचे नित आश्रयदाता ।
दीनजनांना प्रेरक जीवन शाश्वत जे आता ॥२॥
