रचना क्र. 36
श्री सिद्धारूढस्वामींची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय जय सिद्धारूढस्वामी, जय शिवअवतारा ।
नित्य, निरंजन, अभेद असुनी, आरति स्वीकारा ॥धृ॥
श्री शंभूंनी दुष्ट नाशिले, अवतरुनी बहुत ।
देवसज्जना रक्षण दिधले, त्या त्या काळात ।
या अवतारी नाश न करिता, पालटता चित्त ।
शांति धरूनी शुद्धबुद्धिचे, जन केले अमित ॥१॥
जिज्ञासूंना आत्मबोध अन्, भक्तांना नाम ।
शास्त्रश्रवण, सहवास देउनी, केले निष्काम ।
कुणास शिक्षा, प्रत्यय, दीक्षा, शिकवियले प्रेम ।
दीनांच्या हाकेस्तव येता, असुनि पूर्णब्रह्म ॥२॥
