रचना क्र. 516
वाटे अमृत घेउनि अमर
श्री पेठेकाका · null
null
वाटे अमृत घेउनि अमर ।
देहे देव नारी नर ।। १ ।।
अमर देहाने जरि होणे ।
होईल उपभोगांचे जिणे ।।२ ।।
उपयोगा काय आले ।
जरी देह अमर झाले ।। ३ ।।
देहे लागे जावे यावे ।
तरी अमृत हे तो नव्हे ।। ४ ।।
सद्गुरु देती लीलामृत ।
निरिच्छ शुद्ध करिते चित्त ।। ५ ।।
देह वासनेचा जाळी ।
शुद्ध जीव आज्ञा पाळी ।। ६ ।।
दीन म्हणे अमृत खरे ।
जन्मा येण्या कारण नुरे ।। ७ ।।
