रचना क्र. 509
देवा तुझेच हे घरदार
श्री पेठेकाका · null
null
देवा तुझेच हे घरदार ।
परी ना तुज येण्या द्वार ।। १ ।।
अवघा अंतरी अंधार ।
प्रकाश शोधितो बाहेर ।।२ ।।
जगी आधीचाच गोवा ।
तेणे दु:ख वाढे जीवा ।। ३ ।।
देवा आवरी ही माया ।
आत तुम्हा येऊ द्याया ।। ४ ।।
तुम्ही येता प्रकाश येई ।
दर्शन अंतरीचे होई ।। ५ ।।
दीन म्हणे जपुया देव ।
गाठू आनंदाचा गाव ।। ६ ।।
