रचना क्र. 499
याचसाठी केला होता अट्टाहास
श्री तुकोबा · null
null
याचसाठी केला होता अट्टाहास |
शेवटचा दीस गोड व्हावा || धृ ||
आता निश्चितीने पावलो विसावा |
खुंटलिया धावा तृष्णेचिया || १ ||
कवतुक वाटे झालीया वेचाचे |
नाव मंगळाचे तेणे गुणे || २ ||
तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी |
आता दिवस चारी खेळीमेळी || ३ ||
