रचना क्र. 489
श्री विनोबांची आरती
श्री पेठेकाका · null
null
दैवीगुणसंपन्ना ऋषिवर आचार्या ।
देई शक्तीबुद्धी तव ऋण फेडाया ।। धृ ।। जय जय विनोबा...
मानायोग्य असुनी, नावडे मान ।
स्तुतिसी योग्य असुनी, न s घेइ स्तवन ।
पूजास्थानी असुनी, नच घे पूजन ।
तेची स्थान खरे, करण्या गुणगान ।।१।। जय जय विनोबा...
कुशाग्र बुद्धी परिणत प्रज्ञा चारित्र्य ।
कुराणबायबलवेदग्रहण वैचित्र्य ।
भूमीदान समता ध्यास सर्वत्र ।
त्यागी जीवन कळण्या लागे सत्पात्र ।। २ ।। जय जय विनोबा...
प्रवचन वा गीताई, धर्मामृत, सूत्र ।
‘सत्यशोधन’, ‘जय जग’ , जगण्याचे मंत्र ।
शिक्षण देते बाबा,तुमचे चरित्र ।
दीना पुरु दे एक, वस्त्र अन् पात्र ।। जय जय विनोबा...
