रचना क्र. 487
श्री नानामहाराज तराणेकर यांची आरती
श्री पेठेकाका · null
null
सद्भावे श्री गुरुनानांसी ओवाळू आरती ।
ज्ञानभक्तियोगाची उजळू सगुण प्रेममूर्ती ॥धृ॥
जयजय ओवाळू आरती..
संपादुन अकराव्या वर्षी वेदशास्त्र गहन ।
मग गुरुप्राप्तीसाठी केले तीव्र अनुष्ठान ।
टेंब्येस्वामी प्रकट जाहले तीव्र तपा पाहुन ।
मंत्र आणि उपदेशा देती तराण्यास येऊन ॥१॥
अंतर्योगी राहुनि धरिती बाह्य सौम्य भावा ।
सर्वांसाठी सुलभ मार्ग जो दत्त दत्त गावा ।
भेद न करिता सर्वां देता आज भक्तिमेवा ।
दीनजनांना चरणी नाना ठाव नित्य द्यावा ॥२॥
