रचना क्र. 485
श्री योगी अरविंदांची आरती
श्री पेठेकाका · null
null
आरति अरविंदा, योगीs ||धृ||
दिव्यतेतुनी विश्व जन्मते |
जडचेतन वा असो कसे ते |
शरीर, मन वा सृष्टिरूप ते |
गाठू दे दिव्यता ते सदा ||१|| आरति अरविंदा...
अहंकार हे असे बालपण |
विश्वात्मकता हेच थोरपण |
दीना, जडता हे अवरोहण |
आरोहण हो ध्येय सर्वदा ||२|| आरति अरविंदा...
