रचना क्र. 483
श्री वासुदेव कृष्णाची आरती
श्री पेठेकाका · null
null
वासुदेव हे जय श्रीकृष्णा | ओवाळू भावे |
आरती, ओवाळू भावे ||
हे परमात्मन् तुमचे दर्शन जळीस्थळी व्हावे ||धृ||
जन्मोजन्मी शिणलो देवा |
उद्धाराचा मार्ग न ठावा |
भवगोवर्धन अमुचा देवा |
तुम्हीच पेलावा |
लीलया, तुम्हीच पेलावा ||१||
द्या देवा तव अपूर्व शांती |
रणी, वनी वा एकच वृत्ती |
स्मरण राहु दे अमुच्या चित्ती |
इतुके द्या देवा |
दीना, इतुके द्या देवा ||२||
